मंगळवार, ७ जून, २०२२

आई नाही तर काही नाही

 चुकल्यावर खालेल्ला मार म्हणजे आई

पडल्यावर मिळालेला आधार म्हणजे आई..

मूल जेवल्यावर जीची भुख मिठली ती आई.

सतत जिच्या मनात पोराचं सुख म्हणजे आई..

जगाशी माझ्याशी भांडणरी म्हणजे आई.

हरवेल्या वस्तू शोधून देणारी आई .

आई म्हणजे खूप काही..

कारण आई नाही तर जगात काही नाही .

मंगळवार, १९ मे, २०२०

कोकणी माणूस आणि चाकरमानी

आधी बोलायचो कोकणी माणूस  येवा कोकण आपलाच असा..
पण मुंबईकरांनो या रोगात तुम्ही घरात बसा..
तुमचे आऊस बापुस.असतत गावाक  ..
त्यांच्या वयाचा तरी जरा विचार करा..
आणि
गाववाले पण काय काय असे वागतात.जसे दुश्मन इले..
अरे विसरलात या चाकरमान्या मुळे कोकणात चांगले दिवस इले.

७० हजार लोकांनी काढले बोलतत कोकणात जायचे पास..
पण कळत नाही त्यांका आपल्या मूळे होतलो कोकण नापास..
गाव वाल्यांका सांगतंय पावणे नाहीत ते..
कामाक मुंबई क गेलास की आठवतात हे.
आपलीच पोरा शिकुक तर कोण कामक मुंबईक गेली 
आता तुम्ही बोलतात रोग घेऊन इली

आधी बोलायचो कोकणी माणूस  येवा कोकण आपलाच असा..
पण मुंबईकरांनो या रोगात तुम्ही घरात बसा..
मुंबईकर पण ऐकत नाही.. घरात बसुक सांगितल्यानी आहे
यांची पहिली गाडी काडून घ्या. यांका सगळीकडे गावात फिरायचा आहे..
अरे हॉस्पिटल डॉक्टर एवढी सुखसुविधा नाही गावात  .. तांदळाची पेज पितात ते सर्दी खोखला तापात..
आजारी पडल्यावर तुम्ही .. कुठे पळायचा ह्यांनी
आपल्या पोर बाळांची काळजी म्हणून अडवला तुमका त्यांनी

मान्य आहे कोण खाज म्हणून जात नाही गावात..
पैसे संपले इथे.आता नाही थांबत शहरात..
१० बाय १० मध्ये राहणारे .मुंबईक त्यांना वाटता भिती
म्हणून आठवता प्रत्येकास आपली गावची माती
हकलऊ नका रे वेशिवरून त्यांका..
आपलेच भावकितले ते. अडचणीत मदत करा
 आयुष्भर  ठेवतील लक्षात तुमका
 आधी बोलायचो कोकणी माणूस  येवा कोकण आपलाच असा..पण मुंबईकरांनो या रोगात तुम्ही घरात बसा..
जे आता इले गावाक त्यांची काळजी घ्या...
जे वेशीवर आहेत त्यांना इज्जत द्या..
ज्यांना नाही मिळालं जायला त्यांनी नाराज होऊ नका..
तो वरचो बघता हा आपल्याकडे. हा आपल्या पाठीशी
गणपतीक जायाचा गावक .. त्या तयारीला लागा



बुधवार, ७ ऑगस्ट, २०१९

९० मधली पोर..

आम्ही ९० मधली पोर.
अस वाटत आमचा  काळ बरा होता

काळ आमचा वेगळा होता..
बदल दुनियेत होत होता..
P.c.o. पासून मोबाईल..
ते मालगुडी डेज पासून  शक्तिमान पर्यंत
हा काळ आम्हाला शिकवत होता
अस वाटत आमचा  काळ बरा होता

इंटरनेट नव्हत तेव्हा म्हणून जग कळत नसेल..
पण त्यामुळे बाकीच्या गोष्टींना वेळ मिळत असेल..

खेळ आम्ही खेळलो नाही तर जगलो आहे
सूर्यास्तापर्यंत मैदानात थांबलो आहे
आई बापाने ओढत मारत मैदानातून नेला आहे
क्रिकेट ,भोवरे, गोटया, लगोरी हे खेळ जगलो आहे
आणि तेव्हाच्या  लपाछुपीतला धप्पा आताच पब्जी मध्ये शोधतो आहे..
सापशिडी परत मोबाईल वर खेळतो आहे

फेसबुक सारखे  हजार मित्र नव्हते...
पण हाक मारली की येणारे ४ जिगरी यार होते..
आता भेटल्यावर सेल्फी लागतो,
तेव्हा फोटो वर्षातून एकदा काढले जात होते

अभ्यास केला आम्ही कारण मोबाईल नव्हता
२ चॅनल टीव्ही वर कार्टून बघायचा वेळ पण ठरलेला होता
..
फक्त गाणी नाही advertise पण पाठ होत्या
एकदा miss झालेला एपिसोड परत मिळत नव्हता

सण आम्ही  साजरे मोबाईल वर नाही तर एकत्र मिळून केले ...आता नातेवाईक घरी येऊन बरेच दिवस गेले

खरं खोटं करण्यासाठी गूगल नव्हता...
थोरामोठ्यांनी सांगितलेला इतिहास आम्हाला ठाऊक होता..

कधी कधी वाटतं आम्ही ९० मधली पोर.. आमचा  काळ बरा होता

योगेश राणे

बुधवार, १९ सप्टेंबर, २०१८

कोकणातला गणेश उत्सव

कोकणात गणेश उत्सव म्हणजे वेगळाच अनुभव.. आधी बाबा जात होते गावाला .. पण एकदा हट्ट करून मी आलो गणपतीला..तो अनुभव असा होता की नंतर गणपतीला मुंबई कधी थांबलो नाही...तुम्ही जर कोकणात गणपतीला येत असाल तर तयारी ३महिने आधी सुरू होते पहिलं काम रेल्वे तिकीट बुक करणे.. एक वेळ तुम्हाला निवडणुकीची  सिट मिळेल पण ही रेल्वे ची सिट गणपतीत काय मिळतं नाही. रेल्वे ने पावसात प्रवास करत मजाच वेगळी असते. धबधबे सर्वत्र हिरवागार निसर्ग.. माझ गाव कणकवली त्यामुळे मला रेल्वे ने उतरून लगेच घरी पोहचता येत होते पण काही गाव तर तिथून खूप लांब होती . लोक तो प्रवास पुढे एस टी ने करायची. रेल्वे फुल्ल होते त्यावरून एक गोष्ट नक्की चाकरमानी कुठला पण असो कुठल्याही जगाच्या कोपऱ्यात असो गणपतीला कोकणात येणार... अहो गणपती साजरा तसा होतो .. गणपतीचा पाट नागपंचमी दिलेला असायचा कार्यशाळेत. आणि गणपती आपल्याच पाटावर तयार असायचा.. गणपतीच्या ठेवतात त्याचा मागे फुलाच चित्र काढलेलं असायचं.. वरती रान फुल लावलेली असायची (कवंडल) ही बाजारातून नाही आपल्याच रानातून काडलेली असायची सजावट बघाल तर साधी असायची पण सुंदर असायची .. जास्वंद हार केलेला असायचा कारण जास्वंद झाड खळ्यात होत .प्रतेक जन त्याला झेपेल तस सजावट करत असे आणि गणपती भातशेती मधून वाट काढत घरी येत असे...मग घरच्या सगळ्या बायका गणपतीला पुजून घरात घेत असे.. इथे गणपती खूप आधीपासून बसतो त्यामुळे २ ते ३ पिढीची माणस. काका काकी त्यांची मुलं त्यांची मुलं अस करून ३० ते ४० माणस असायची असा सगळ्यांचा एक गणपती असतो आणि तो मूळ घरात बसवला जातो. जेवताना पंगत उठायची. कोकणात मंडळ कमी आहे बोलतात ना अहो एका घरात एवढी माणस येतात की मंडळ तयार होतात. पहिल्या दिवशी पूर्ण वाडी आरती करायला हजर.. लहान मुलांपासून मोठ्या  पर्यंत वाडीतला प्रतेक जन आरतीला येत असे.आम्ही गेलो तर आमच्याकडे पण येणार. आरती पण  वेगळी  असे सुर वेळले चाल वेगळी आणि महत्वाचं कोणाला पुस्तक लागत नाही आरती आठवायला.  प्रतेक घरात आरती करून दुपारच्या जेवणाला वेळ होत असे .पण जेवण पण काय चुलीवर भाकरी केलेली. इथे शेगडी आहे प्रत्येकाकडे पण चूल कोणी बंद नाही केली..केळीच्या पानावर जेवण. आपल्याच विहिरीतील पाणी भूक थोडी जास्त लागलेली असायची.. मग रात्री भजनाची तयारी वाडीतल्या कोणाचे टाळ कोणाची पेटी कोण चांगला गातो तो बुवा.. असा वाडीतल भजन होत असे.. गजर कव्वाली गात रात्र सरत असे भजना बरोबर खायला काय देणार याची सुधा स्पर्धा रंगते..यांनी मिसळ पाव तर आम्ही पाव भाजी.. गौरी च्या दिवशी बायकांच्या फुगड्या ऐकणायात आणि बघण्यावत जी मजा असते ती सांगता येणारी नाही गौरीचे ओवसे.. नवीन लग्न झालेलं जोडपं हे गौरी चा ओवसा भरायला येत असे.. त्याने जोड्याने वाडीतल्या प्रत्येकाच्या घरी जाऊन ओवसां दयायची प्रथा आहे. ताशा वाजवत सगळ्याच्या घरी जात नव जोडपं आहे हे सगळ्यांना कळत असे.. ११ दिवस कसे जायचे हेच कळत नाही. विसर्जन सगळ्या गणपतीचं एकत्र होत असे. कोण पुढे कोण मागे नाही .. नदीवर टाळ वाजवत..गणपती घेऊन जायचे .लहान मूल फटाके उडवत.. मग गावच्या नदीवर एकत्र गणपती ठेऊन जोरात आरती होते आणि सगळ्यांचा प्रसाद एकत्र करून वाटला जात असे.. जी मुंबईला लोक दिवाळी साजरी करतात ना त्यापेक्षा जास्त उत्साहात कोकणात गणपती साजरा करतात.. इथे पैशाची उधळण नाही गणपती माणसांनी श्रीमंत असतो.. एकदा येऊन बघा कोकणातला गणपती काय असतो.  
योगेश राणे

रविवार, २४ डिसेंबर, २०१७

चला बसूया

चला बसुया  ...
आनंद असुदे नाहीतर दुःख आमच्याकडे एकच वाक्य
चला बसुया ...
जिकडे निघतो डोक्यातला भार ...
आजकाल मित्र  भेटतो ती जागा म्हणजे बार ...
पोल्टीक्स पासून बायको सगळ्यावर होतात जिथे  वाद विवाद ...
जो टाईट होतो  तोच जिंकतो  बाकी सगळे या  स्पर्धेत बाद
आनंद असुदे नाहीतर दुःख आमच्याकडे एकच वाक्य
चला बसुया ...
१ प्याग घेऊ आणि निघू असं कधी होत नाही ...
बाहेर शिंपडल्याशिवाय सुरवात इथे करत नाही(संस्कार)
एकतरी असतो नुसता चकणा खाणारा  आणि कोल्डड्रिंक पिणारा त्यात ...
  असे मित्र पित नाही पण आमच्या बसुया मंडळात असतात
घरी सोडण्यात आणि काल काय काय  बोललो हे तेच सांगतात
आनंद असुदे नाहीतर दुःख आमच्याकडे एकच वाक्य
चला बसुया
Yr

गुरुवार, २४ ऑगस्ट, २०१७

11 दिवस आनंदाला उभार येणार

११ दिवस आनंदाला उभार येणार
गणपती  सणाचा इव्हेंट होणार ...

आगमन सोहळ्याला पण DJ आणि बँड  बाजा ...

प्रत्येक गल्लीत आपले स्वतंत्र राजा ..

२० फूट तर कुठे २५ अशी स्पर्धा रंगणार

dj वर  शांताबाई तर कुठे झिंगाठ  लागणार

नवसाला पावतो म्हाणून रांगा लागणार .. ..

कार्यकर्ते  देवावर मालकी हक्क  गाजवणार

११ दिवस आनंदाला उभार येणार

गणपती  सणाचा इव्हेंट होणार ...

कोण करणार भक्ती भाव ...

कुठे रंगणार पत्त्याचे डाव

एका दोघांमुळे खराब होत सगळ्यांचं नाव ...

आरत्या म्हणायला लागत  पुस्तक अशी आमची अवस्था आहे

पुढची पिढी dj  मागवेलं कारण सगळी गाणी तोंडपाठ आहेत

आधी  आरास (देखवा) अशी असायची की  होत होते   प्रबोधन ...

आता चर्चा होते देवाला किती आला देणगी रूपात धन ...

पारंपरिक खेळ विसरलो आपण या इवेंटच्या  खेळात

वकृत्व ,कला अशा  स्पर्धाचे सुरवात झाली याच   मंडळात ..

विसर्जन हीच आहे आता या सगळ्यांची  सांगता

एवढे  बोलतात त्यांचं नाही ऐकत  मी काय सांगु  ..

आता संपवतो या बद्दल काही न सांगता

सण  सेलिब्रेट नको साजरा करूया ...
सणाचा इव्हेंट नको करूया

आणि हा गणपती बाप्पा मोरया हे राहील होत

रविवार, ८ जानेवारी, २०१७

भाव कधी भावावर प्रेम दाखवत नसतो

भाव कधी भावावर प्रेम दाखवत नसतो...
सोशल मिडिया असुदे नाहीतर आणि कुटे भावा भावा भावाच्या प्रेमाचा कधी दिखवा नसतो ..
Love u  सोडा कसा आहेस असा सुधा कधी म्हणालेला नसतो .. फोन असुदे नाहीतर घरी फ़क्त कामपुरतीच् बोललेला असतो..
भाव कधी प्रेम दाखवत नसतो पण तो करत असतो

दोघांचा एकत्र फ़ोटो लहानपणी काढलेला असतो.. नंतर खांद्यावर हात ठेऊन फ़ोटो काड बोला फ़क्त ऑक्वर्डनेस असतो.. भाव कधी भावाला थैंक्स म्हणत नसतो ..
भाव कधी प्रेम दाखवत नसतो पण तो करत असतो

कपडे असुदे नाहीतर पैसे .. सगळ एकमेकांच् वापरत असतो... घरात हव तेवडा भांडेल ..बाहेर वेगळाच आदर ठेवत असतो ...
भाव कधी प्रेम दाखवत नसतो पण तो करत असतो

बायको आली की बदलतात गोष्टी
प्रेम न दाखवणारा भाव मुलांचा काका.. बायकोचा भावजी असतो..
फ़क्त सण समारंभाला भेटत असतो..

वेळ आहे तो पर्यत दाखवा प्रेम...
नंतर तो एक नातेवाईक होउन बसतो..

एकदा भावाला फ़क्त थंक्स म्हणूया ... love u नको कारण
भाव कधी प्रेम दाखवत नसतो पण तो करत असतो

योगेश राणे ... माझ्या भावासाठी दीपेश राणे साठी Thanks bro for everything..